भडंग
Submitted by plooma on 3 March, 2017 - 04:18
साहित्य
चुरमुरे,शेंगदाणे, लसुण ,कढीलिंब ,जीरे मोहरी ,लाल तिखट,हळद ,मिठ ,तेल अंदाजे .फरसाण ऐच्छिक .
कृती
भांड्यात तेल तापवून त्यात जीरे ,मोहरी कढीलिंब,ठेचलेला लसुण , शेंगदाणे घालावे .शेंगदाणे चांगले कुरकूरीत होईपर्यंत परतावे .नंतर हळद ,लाल तिखट ,मिठ घालून थोडे परतुन लगेच चुरमुरे घालावे व चांगले परतुन गॕस बंद करावा.भडंग तयार .