भडंग

Submitted by plooma on 2 March, 2017 - 13:58

साहित्य
चुरमुरे,शेंगदाणे, लसुण ,कढीलिंब ,जीरे मोहरी ,लाल तिखट,हळद ,मिठ ,तेल अंदाजे .फरसाण ऐच्छिक .
कृती
भांड्यात तेल तापवून त्यात जीरे ,मोहरी कढीलिंब,ठेचलेला लसुण , शेंगदाणे घालावे .शेंगदाणे चांगले कुरकूरीत होईपर्यंत परतावे .नंतर हळद ,लाल तिखट ,मिठ घालून थोडे परतुन लगेच चुरमुरे घालावे व चांगले परतुन गॕस बंद करावा.भडंग तयार .
आवडत असल्यास वरुन फरसाण घालावा .IMG20170302164833-800x600.jpgIMG20170302165015-800x600.jpgIMG20170302165313-768x1024.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आवडत असल्यास वरुन फरसाण घालावा .>> हो तर आवडतेच भडंगमध्ये फरसाण. जसे कांदेपोहे म्हटले की शेंगदाणे लज्जत वाढवतात तसे फरसाण भडंगबाबत करते. पण ते विशिष्ट फरसाणच हवे. कुठलेही न चालसे Happy

@plooma , हे लिहण्यासाठी लेखनाचा धागा हा प्रकार वापरण्यापेक्षा कृपया पाककृती हा प्रकार वापरणार ?
http://www.maayboli.com/node/add/recipe?og_group_ref=2548&destination=no...

तसे केले तर वर्गीकरण आणि नंतर सापडायला सोपे होते.

आभार सर्वांना ....
वेब मास्टर पाककृतितील पहीलीच पोस्ट असल्याने समजले नाही .पुन्हा पोस्ट करते.