पूर्वप्राथमिक (preprimary) शाळेकरिता कोणत्या परवानग्या आवश्यक आहेत?
Submitted by अतुल. on 9 February, 2017 - 02:46
पुण्यात पूर्वप्राथमिक (Pre-primary) शाळा सुरु करायची असेल तर त्या करीता कोणत्या परवानग्या लागतात व काय प्रोसेस आहे त्या विषयी कुणाला माहिती असल्यास कृपया सांगणे.
मी गुगल करून पाहिले तर या संबंधी काही वृत्ते वाचायला मिळाली. त्यानुसार २०११ पूर्वी पूर्वप्राथमिक शाळेस कोणतीही परवानगी लागत नसे. पण मागच्या पाच सहा वर्षात सरकारने या शाळा सरकारी नियंत्रण अंतर्गत आणण्याचे घाटले आहे असे एकंदर लक्षात आले. काहींना विचारले तर वेगवेगळी माहिती मिळत आहे व गोंधळात भरच पडत आहे.
शब्दखुणा: