पुण्यात पूर्वप्राथमिक (Pre-primary) शाळा सुरु करायची असेल तर त्या करीता कोणत्या परवानग्या लागतात व काय प्रोसेस आहे त्या विषयी कुणाला माहिती असल्यास कृपया सांगणे.
मी गुगल करून पाहिले तर या संबंधी काही वृत्ते वाचायला मिळाली. त्यानुसार २०११ पूर्वी पूर्वप्राथमिक शाळेस कोणतीही परवानगी लागत नसे. पण मागच्या पाच सहा वर्षात सरकारने या शाळा सरकारी नियंत्रण अंतर्गत आणण्याचे घाटले आहे असे एकंदर लक्षात आले. काहींना विचारले तर वेगवेगळी माहिती मिळत आहे व गोंधळात भरच पडत आहे.
सध्या नक्की काय स्थिती आहे? अद्यापही या शाळा सरकारच्या शिक्षण खात्याच्या नियमाखाली येतात का? येत असतील तर त्यासाठी कोणत्या परवानग्या आवश्यक आहेत? संस्था नोंद करण्याची आवश्यकता आहे का? काही जणांनी या शाळांना शॉप एक्ट लागू आहे असे सांगितले ते खरे आहे का?
जर इथे कोणी अशी शाळा चालवत असेल किंवा त्यासंबंधी कोणास काही ठोस माहिती असेल तर ती शेअर केल्यास खूप मदत होईल.
आभारी आहे.