रौफ

रौफ (Rauf) - बाल्य हरवण्याचा एक प्रवास

Submitted by भास्कराचार्य on 3 February, 2017 - 07:46

लहानपणी आपण आजोळी आजीकडे जातो. उन्हाळ्याच्या सुट्टीत बागडतो, नाचतो, आंबे खातो, धमाल करतो. पांढर्‍यास्वच्छ लुगड्यात वावरणारी आजी आपले लाड करत असते. आवडणारं तव्यावरचं पिठलं, नाहीतर तांदळाचं घावन, असे काहीन् काही ज्याच्या त्याच्या आवडीचे पदार्थ करत राहते. मग हळूहळू वय वाढतं, तसं आपलं जाणंयेणं कमी होत जातं. व्याप वाढत जातात. मग कधीतरी ध्रुवतार्‍यासारखी अढळ भासणारी आपली आजी खरंच आकाशात तारा व्हायला म्हणून निघून जाते, आणि आपल्याला जाणवतं, की कपाटात घडीत आखडून पडलेल्या त्या लुगड्याच्या विरण्यासारखंच आपलं बाल्य हळूहळू विरत चाललेलं आहे.

विषय: 
Subscribe to RSS - रौफ