पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०१७

द इनोसंट्स (Les Innocents) - निरागसता पाश दैवे

Submitted by भास्कराचार्य on 24 May, 2017 - 02:52

`प्लेग्राऊंड' बघितल्यावर मनात भावनांचा कल्लोळ खूप वाढला होता. काळोखाची जाणीव फार झाली, अशी भावना मनात दाटून आली होती. काहीतरी मनाला सुखावणारं आता बघायला मिळावं, असं सारखं वाटत होतं. सुदैवाने पुढच्या 'द इनोसंट्स'ने ती इच्छा बर्‍यापैकी पूर्ण केली.

विषय: 

प्लेग्राऊंड (Plac Zabaw) - काळंकुट्ट मैदान

Submitted by भास्कराचार्य on 20 February, 2017 - 01:11

``मला ह्या चित्रपटाविषयी काही लिहायचं नाही.''

``I do not wish to write about this movie.''

विषय: 

रौफ (Rauf) - बाल्य हरवण्याचा एक प्रवास

Submitted by भास्कराचार्य on 3 February, 2017 - 07:46

लहानपणी आपण आजोळी आजीकडे जातो. उन्हाळ्याच्या सुट्टीत बागडतो, नाचतो, आंबे खातो, धमाल करतो. पांढर्‍यास्वच्छ लुगड्यात वावरणारी आजी आपले लाड करत असते. आवडणारं तव्यावरचं पिठलं, नाहीतर तांदळाचं घावन, असे काहीन् काही ज्याच्या त्याच्या आवडीचे पदार्थ करत राहते. मग हळूहळू वय वाढतं, तसं आपलं जाणंयेणं कमी होत जातं. व्याप वाढत जातात. मग कधीतरी ध्रुवतार्‍यासारखी अढळ भासणारी आपली आजी खरंच आकाशात तारा व्हायला म्हणून निघून जाते, आणि आपल्याला जाणवतं, की कपाटात घडीत आखडून पडलेल्या त्या लुगड्याच्या विरण्यासारखंच आपलं बाल्य हळूहळू विरत चाललेलं आहे.

विषय: 

थँक यू फॉर बाँबिंग (Thank You For Bombing) - थँक यू फॉर मेकिंग!

Submitted by भास्कराचार्य on 25 January, 2017 - 04:49

`ऑब्झर्व्हर इफेक्ट'विषयी तुम्ही ऐकले असेल. प्रयोगकर्त्याच्या निरीक्षण करण्याच्या कृतीचा परिणाम त्या प्रयोगावरच आणि पर्यायाने त्या निरीक्षणांवरच होतो, असा काहीसा हा इफेक्ट आहे. (बर्‍याचदा लोक ह्यास `हायझेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल'शी कन्फ्युज करतात, पण तो वेगळा विषय आहे.) `थँक यू फॉर बाँबिंग' ह्या बार्बरा एडरच्या ऑस्ट्रियन चित्रपटातली पात्रेही अशीच `स्टोरी' शोधणे आणि स्वतःच `स्टोरी' होणे, ह्यातल्या अस्पष्ट रेषेवर तारेवरची कसरत करत दोलायमान अवस्थेत कधी इकडे तर कधी तिकडे अशी हिंदकळत जातात, आणि त्यांच्याबरोबरच आपल्यालाही धक्के बसत राहतात.

विषय: 

लेथ जोशी - तुम्ही आहात एकदम सेट जोशी!

Submitted by भास्कराचार्य on 18 January, 2017 - 11:38

फारा वर्षांपूर्वी मराठी साहित्यात एक जोशी होऊन गेले. धोंडो भिकाजी जोशी ह्या नावाने वावरणारी ही असामी मनाचा साधेपणा, आणि गमतीशीर अनुभव, ह्यांमुळे सगळ्यांमध्ये भलतीच लोकप्रिय झाली. तुलनेने स्मार्ट असलेली त्यांची बायको, त्यांची ओव्हरस्मार्ट वाटणारी मुलं, चाळीत राहणारे चाळकरी, हपिसातल्या वल्ली, ही सगळी माणसे अगदी आपल्यातलीच होऊन गेली. पिफमधला `लेथ जोशी' हा चित्रपट पाहताना फार दिवसांनी त्या जोश्यांची आठवण आली, हीच गोष्ट बरेच काही सांगून जाते.

विषय: 

यंदाचा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' १२ ते १९ जानेवारीदरम्यान

Submitted by चिनूक्स on 16 December, 2016 - 13:35

तर, यंदाचा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' आता एका महिन्यावर येऊन ठेपला आहे.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित होणारा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' यंदा १२ ते १९ जानेवारी, २०१७दरम्यान होणार आहे. यंदा या महोत्सवाचं हे पंधरावं वर्ष आहे. या वर्षी महोत्सवात अडीचशेहून अधिक चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. शिवाय दरवर्षीप्रमाणे चित्रपटांबरोबरच अनेक कार्यशाळा, चर्चासत्रं, प्रदर्शनं यांचा अंतर्भावही महोत्सवात असेल.

विषय: 
Subscribe to RSS - पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०१७