( एका बागेत होते.... )
Submitted by अमोल केळकर on 25 October, 2016 - 01:16
एका बागेत होते अनेक पक्षी सुरेख
आला होता पक्षी, कोरियाहून ही एक
सदा पडून राही शीत-गृहाच्या संगे
बालहट्ट संमजुनी ते वेगळे तरंगे
दावुनी बोट त्याला मनसे हसती लोक
आला होता पक्षी, कोरियाहून ही एक
पक्षास दु:ख भारी,झोपू पाही तळाशी
कोणीच ना विचारी, राहिले ते उपाशी
जे.जे पाहून बाजूस वाटे उगाच धाक
आला होता पक्षी, कोरियाहून ही एक
विषय: