थोड्याच वेळात माई आल्या. ...................

गोष्ट जुनीच माणसं नवीन (भाग ४था )

Submitted by मिरिंडा on 24 October, 2016 - 04:24

थोड्याच वेळात माई आल्या. त्यांचा पारा चढलेलाच होता. माईंची मुद्रा पाहून सरलाला जरा भीतीच वाटली. तरीही तिनी माईला पाणी हवय का विचारलं. त्यावर माई काहीच बोलली नाही. मग ती तात्याला म्हणाली, " इतका आतल्या गाठीचा निघशील असं वाटलं नव्हतं रे. बायकोच्या नादी लागून लगेच दावा दाखल केलास, काय? " तात्या खाली मान घालून म्हणाला, " माई, खरच, मला शर्मिला आणि जीवन असं काही करतील असं वाटलं नव्हतं. मला सुद्धा मागच्याच आठवड्यात कळलय. कसं सांगू तुला. हे.. हे सगळं तुझ्यामुळे झालं. तात्या चिडून शर्मिलाला म्हणाला. त्यावर ती म्हणाली, " का मिळाली प्रॉपर्टी तर नको आहे का? मांजरासारखं चोरून दूध पिणारी मी नाही.

Subscribe to RSS - थोड्याच वेळात माई आल्या. ...................