शोध मराठीपणाचा - पुस्तक परिचय
Submitted by प्राचीन on 27 May, 2019 - 08:46
माझ्या खेड्यात अनेक जाती धर्माची माणसं आहेत. कुंभारवाडा आहे, महारवाडा आहे, मांगवाडा आहे, बागवान मुलाण्याची घरे आहेत. टेकावर न्हाव्याची वस्ती आहे. गावच्या मध्यभागी वीस खणी ब्राह्मणवाडा आहे. परिटांची अनेक घरे आहेत. बोळात लव्हाराची बैठी घरे आहेत. सोबत गुरवांची चार दोन घरेही आहेत. अशा अठरापगड जमाती आहेत. पण आपसात कधी हेवेदावे होत नसत. मारामाऱ्या झालेल्या कधी ऐकीवात न्हवत्या.