मोबाईल हरवला/ चोरीला गेला आहे आहे.. कृपया मदत करा.
Submitted by पियू on 16 September, 2016 - 02:25
माझा मोबाईल एमाय ४ आय काल रात्री १०.४५ ला खिशातून पडला/ चोरीला गेला आहे.
फोन कोणाला तरी मिळाला असावा कारण काल मोबाईलवरून "आय विल कॉल यू बॅक" असा एसेमेस ११.३० आणि ११.४५ च्या सुमारास आला. हा मेसेज टेम्प्लेट्स मधला आहे जो कॉल कट करतांना दाखवतो. शिवाय खिशातल्या खिशात चुकुन लागलेला एक कॉलही रात्री साधारण १२ च्या सुमारास आला होता. मी फोन उचलला परंतु फक्त आजुबाजुच्या गर्दीचे आवाज येत होते. मी तो कॉल कट करून पुन्हा कॉल केला तर उचलला नाही.
विषय: