माझा मोबाईल एमाय ४ आय काल रात्री १०.४५ ला खिशातून पडला/ चोरीला गेला आहे.
फोन कोणाला तरी मिळाला असावा कारण काल मोबाईलवरून "आय विल कॉल यू बॅक" असा एसेमेस ११.३० आणि ११.४५ च्या सुमारास आला. हा मेसेज टेम्प्लेट्स मधला आहे जो कॉल कट करतांना दाखवतो. शिवाय खिशातल्या खिशात चुकुन लागलेला एक कॉलही रात्री साधारण १२ च्या सुमारास आला होता. मी फोन उचलला परंतु फक्त आजुबाजुच्या गर्दीचे आवाज येत होते. मी तो कॉल कट करून पुन्हा कॉल केला तर उचलला नाही.
फोनमधून सिमकार्ड अद्याप काढलेले नाहीये कारण फोनची रींग संपूर्ण वाजते आहे. पण फोन कोणीही उचलत नाहीये. अर्थात मोबाईलचे सिमकार्ड काढण्याची सिस्टिम इतर फोनपेक्षा जराशी वेगळी आहे. अजून फोनचे सिमकार्ड न काढले गेल्याने मला आशा वाटते आहे कि ज्याच्या हातात फोन मिळाला आहे त्या व्यक्तीला फोन उचलायची सुबुद्धी होईल. (याच कारणाने अजून सिमकार्ड ब्लॉक केलेले नाहीये).
मला काहीही सुचत नाहीये. नेमके फोनमध्ये वायफाय चालू आहे/ डाटा चालू नाहीये. फोनमध्ये साधारण खालील डेटा आहे.
- व्हॉट्सअॅप (पासवर्ड प्रोटेक्टेड)
- काँटॅक्ट्स (नो पासवर्ड) (याचा जीमेलवर बॅकअप आहे बर्यापैकी)
- जीमेलचे २ अकाऊंट्स (नो पासवर्ड ) (जीमेलवर कोणते पासवर्ड वगैरे सेव्ह असल्याचे आठवत नाहीये).
- गॅलरीतले फोटोज (पासवर्ड प्रोटेक्टेड. परंतु पीसीला फोन जोडल्यावर सगळे फोटोज इझीली अॅक्सेसिबल आहेत.)
- फेसबुक (नो पासवर्ड )
- फेसबुक मेसेंजर (पासवर्ड प्रोटेक्टेड)
मला अजून काही लिहायला सुचतही नाहीये. प्लीज मला मदत करा.
मायबोली हा माझा परीवार आहे आणि मला तुमच्या सदिच्छांची खूप गरज आहे.
माझाही मोबाइल हरवला गेल्या
माझाही मोबाइल हरवला गेल्या आठवड्यात. एच्टीसी. हरवलाय हे समजल्याक्षणी कॉल केला तर रींग वाजली उचलला नाही. पुन्हा कॉल केला तर स्विच ऑफ
सगळ्यात आधी तुमचे जीमेल आणि
सगळ्यात आधी तुमचे जीमेल आणि फेसबुकचे पासवर्ड बदला.
१) कीप काम. एक मोठा श्वास
१) कीप काम. एक मोठा श्वास घ्या व पाणी ग्लास भर प्या. पंख्या खाली बसा. ह्याने तुमच्या नर्व्ह्ज शांत व्हायला मदत होईल. फोन मधील सिम कार्ड काढले नाही आहे म्हणजे तो कदाचित कुठेतरी नुसता पडून राहिला आहे. तर तो लास्ट जिथे वापरला होता तिथून जिथे तो हरवला हे लक्षात आले तिथ परेन्त रस्ता
चालून बघा आजू बाजूच्या लोकांना, दुकानात विचारा. रस्त्यात/ कार / रिक्षा मध्ये पड लेला असण्याची शक्यता आहे.
२) पोलि स कंप्लेंट करा.
३) फोन मध्ये चोरी झाल्यास अॅक्टिवेट करायचे काही फीचर असले तर ते अॅक्टिवेट करा.
४) काँटेक्ट्स महत्वाचे. त्याचा बॅकप आहे म्हणता. मग दुसरा साधा फोन घेउन काम चालू ठेवा.
५) व्हाटसेप, फेसबुक व मेसेंजर दुसरी कडून लॉगिन होउन चेक करता येइल.
६) जीमेल वर फर्गॉट पास वर्ड सुविधा वापरून रीसेट करता येइल. ही वर्क इमेल असल्यास अॅडमिनला सांगा.
आयफोन किम्वा फार महागडा फो न असल्यास त्याची अॅटी थेफ्त वारंटी असेल. सेलर चा सल्ला घ्या.
सर्व्हिस प्रोव्हायडर कडे
सर्व्हिस प्रोव्हायडर कडे तक्रार केली नसल्यास करा, सीम कार्ड डिअॅक्टिव्हेट होईल लगेच. आयडी प्रूफ घेऊन त्यांच्या एका सेंटरला भेट द्या, नविन सिम कार्ड मिळेल, तसेच त्या फोनचा IMEI ब्लॉक होईल.
फोन मधील सिम कार्ड काढले नाही
फोन मधील सिम कार्ड काढले नाही आहे म्हणजे तो कदाचित कुठेतरी नुसता पडून राहिला आहे. तर तो लास्ट जिथे वापरला होता तिथून जिथे तो हरवला हे लक्षात आले तिथ परेन्त रस्ता.. >>
हे करून झाले बरेचवेळा.
व्हॉट्सअॅप वापरणे शक्य नाही कारण नवे सिम कार्ड मिळायलाच १ दिवस तरी किमान जाणार आहे अजून.
पासवर्ड्स बदलले. पण फोनमध्ये ऑलरेडी लॉगिन असलेल्या जीमेल अकाऊंटला त्याने कितपत फरक पडतो माहित नाही.
पोलिस कंप्लेंट केली IMEI नंबर सकट. सीम कार्ड डिअॅक्टिवेट केले.
आयडी प्रूफ घेऊन त्यांच्या एका सेंटरला भेट द्या, नविन सिम कार्ड मिळेल >> त्याला वेळ लागेल कारण माझे मुंबई सर्कलचे कार्ड असल्याने मला सिम घ्यायला मुंबईलाच जावे लागेल असे रीलायन्स सर्व्हिस सेंटर म्हणते.
पासवर्ड्स बदलले. पण फोनमध्ये
पासवर्ड्स बदलले. पण फोनमध्ये ऑलरेडी लॉगिन असलेल्या जीमेल अकाऊंटला त्याने कितपत फरक पडतो माहित नाही >> फरक पडतो, कारण लॉग इन होत नाही. आणि नवीन मेल्स सिंक होत नाहीत.. तुम्ही ऑटो सिंक बंद ठेवले असेल तर जेव्हढ्या मेल्स आत्तापर्यंत सिंक झाल्या आहेत त्या कदाचित दिसतील. पण वायफाय कनेक्ट होत नसेल तर तेही दिसणार नाहीत..
पियू, You can remotely track,
पियू, You can remotely track, lock or erase your android phone - if it is ON and has data/WiFi connection enabled. This should at least save your privacy.
check this link: https://support.google.com/accounts/answer/6160500?hl=en
All the Best!
Another link:
Another link: https://security.google.com/settings/intro/security/find-your-phone
वैनील.. आता मोबाईल हातात
वैनील.. आता मोबाईल हातात नसल्यावर ते अॅप कसे डाऊनलोड करू?
जर तुमचे Mi वर account असेल
जर तुमचे Mi वर account असेल तर तुम्ही तो track करू शकता...
http://techsarjan.com/2016/06/track-lost-redmi-2-prime-xiaomi-phones.html
http://webcazine.com/10173/ho
http://webcazine.com/10173/how-to-locate-and-remote-control-your-lost-xi...
फोन स्विच ऑफ केला नाही, कट
फोन स्विच ऑफ केला नाही, कट करताना मेसेज पाठवले गेले, म्हणजे हाताळायची समज नाही अश्या व्यक्तीच्या हातात पडला आहे. त्यामुळे त्याला लगेच गैरवापर करायला जमणारही नाही. टेंशन घेऊ नका. थोडा अंदाज घेत सिम आणि फोन बंद करू शकता.
पण व्यक्ती प्रामाणिक नाहीये त्यामुळे फोन गेलाच समजा, नुकसान झाले याची मनाची तयारी करा..
जीमेल वगैरे पासवर्ड बदलले तर ते पुरेसे ठरावे माझ्यामते,
तरी शंका असल्यास हा प्रयोग आपण घरच्याघरी करून कन्फर्म करू शकता..
एक जनरल शंका - सिम चालू असेल तर ते कुठे आहे हे लगेच ट्रेस करता येते ना. पण पोलिस किंवा मोबाईल कंपन्या याबाबत मदत करतात का? की छोटीमोठी केस कशाला कष्ट घ्या अशी पॉलिसी असते?
पोलिसांनी रिक्वेस्ट केल्यासच
पोलिसांनी रिक्वेस्ट केल्यासच मोबाईल कंपनी 'ते' सिम कुठल्या टॉवरवरून सिग्नल घेते आहे किंवा सिम/फोन बंद असल्यास/ नेटवर्क नसल्यास लास्ट कुठल्या टॉवरला लॅच झाले होते ही माहीती देतात.
टॉवरची क्षमता लिमिटेड असल्यानी त्या पर्टीक्युलर भागात शोध घेता येतो.
फोन जर नेटवर्क शी जोडलेला असेल आणि/ किंवा जिपीएस सुरू असेल तर अर्थातच पिनपॉईंटेड लोकेशन मिळेल.
जिपीएस चालू असते तर कदाचीत
जिपीएस चालू असते तर कदाचीत फोन मिळाला असता .
असो,गेला फोन असे समजा व सिम ब्लॉक करुन टाका.ज्याला सापडला त्याची नियत असती तर त्याने परत कॉलबॅक केले असते.
काल रेडिओ वर बातमी आली
काल रेडिओ वर बातमी आली आहे,१०० मोबाईल गणपतीच्या गर्दीत चोरीला गेले म्हणून.काळ ओला कॅब एक लेडी आर्ची चालवत होता,(स्वतःची गाडी घरी शेत जमीन ट्रॅक्टर वगैरे,तो पण सारखा दुपारी ट्रॅक्टर घेऊन शेतावर गेलतो सांगत होता सारखा) त्याच्या भावाचा आय फोन गेला.
एफ आय आर करून ठेवावा,दहशतवादी मिस युज झाल्यास आपल्याकडे पुरावा असतो चोरी झाल्याचा.
बाकी फोन ला बाय करून शांत पणे डाटा बँक अप किती आहे वगैरे जुळवाजुळवी लॅपटॉप वरून चालू कर,आपण समजतो तितके नव्याने चालू नाही करावे लागत.,फार भारी नव्हता ना?
पोलीस भरपूर ओव्हरलोड असतात,
पोलीस भरपूर ओव्हरलोड असतात, मोबाईल चोऱ्या ना वेळ क्वचित देऊ शकतात.पण एफ आय आर केल्यास आपल्या पाशी फोन नसल्याचा पुरावा राहतो.त्या फोन वरून काही अकाउंट हॅकिंग उपद्व्याप झाल्यास सायबर सेल ला तक्रार करता येईल.
या सर्वात लहान मूल किंवा माकड किंवा सद्गृहस्थानच्या हातात गेला असल्यास अपडेट मिळेलच.
पोलिसांनी रिक्वेस्ट केल्यासच
पोलिसांनी रिक्वेस्ट केल्यासच मोबाईल कंपनी 'ते' सिम कुठल्या टॉवरवरून सिग्नल घेते आहे किंवा सिम/फोन बंद असल्यास/ नेटवर्क नसल्यास लास्ट कुठल्या टॉवरला लॅच झाले होते ही माहीती देतात.
>> पोलिसांना ट्रॅक करायची विनंती केली असता ते म्हणाले कि आता ती सुविधा आमच्यासाठी बंद केली आहे. तसा ट्रॅक करायचा असल्यास कमिशनर ऑफिसला पोलिस स्टेशनमधून विनंतीपत्र जावे लागते. त्याला ५-६ दिवस लागतील आणि त्यापुढे त्यांची परवानगी कधी येईल ते माहित नाही इ.इ. मी स्वतः परवानगी घेऊ शकते का इ. माहित नाही.
फार भारी नव्हता ना? >> याचे
फार भारी नव्हता ना? >> याचे उत्तर काय द्यावे? माझ्यासाठी भारीच होता. :(
स्मायली मात्र भारी आहे
स्मायली मात्र भारी आहे
स्मायलीने आपल्या मन:स्थितीचा
स्मायलीने आपल्या मन:स्थितीचा नेमका अंदाज आला. अरेरे!!! वाईट वाटले. आपल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
ह्या दिवसात अशा चॊऱ्या खूप
ह्या दिवसात अशा चॊऱ्या खूप होतात. सहज फेबुवर एक स्टेटस दिसले ते इथे शेअर करतेय. बाकी तुमच्या दुःखात सहभागी आहे, पण आता केवळ प्रार्थना करणे हाती आहे.
एमाय कंपनीला फोन केला.
एमाय कंपनीला फोन केला. त्यांच्या मदतीने लॉगिन करून फोटो इत्यादी डेटा रीट्राईव्ह केला आहे. परंतु डिव्हाईस आत्ता स्विच ऑफ असल्याने ट्रॅक होत नाहीये. त्यांनी सांगितले कि तुम्हालाच मध्ये मध्ये लॉगिन करून बघावे लागेल कि फोन ऑनलाईन आला आहे का (डेटा ला कनेक्ट झाला तर तिथे लोकेट होईल म्हणे).
मानव आणि सचिन
डेटा रीट्राईव्ह झाल्याने जरा चांगल्या मनस्थितीत आहे. त्यामुळे तुमच्या कमेंट्स स्पोर्टींगली घेता आल्या.
साधना.. धन्स.. देव/ अल्लाह/ येशु करो आणि माझाही मोबाईल लवकर ट्रेस होवो.
डाटा झाला ना, एम आय ३ किंवा ४
डाटा झाला ना, एम आय ३ किंवा ४ असेल.
माझा एम आय नोट भरपूर पावसात बरेचदा भिजल्याने डिस्प्ले गेला, आता नवा एम आय घेऊन १ महिना झाला.पण डाटा घेता येत नसला तरी स्वतः जवळ असल्याचं समाधान आहे.लॅपटॉप पण बंद आहे त्यामुळे बॅक अप रिट्रीव्ह सध्या करता येत नाहीये.काँटेक्ट्स फोटो आणि डॉक्युमेंट्स मिळाले आहेत बरेच.
एम आय फोर आय आहे अनु.
एम आय फोर आय आहे अनु.
एमाय कंपनीला फोन केला.
एमाय कंपनीला फोन केला. त्यांच्या मदतीने>>>
अरे वा पियू, ही चांगली डेव्हलपमेंट आहे. आता ट्रेसपण होवो तुमचा फोन!
वैनील.. आता मोबाईल हातात
वैनील.. आता मोबाईल हातात नसल्यावर ते अॅप कसे डाऊनलोड करू?
>>> मी दिलेल्या लिंक्स अॅप च्या नाहीयेत. ती गूगलने दिलेली मूलभूत सेवा आहे. कोणत्याही इंटरनेट कनेक्शन असणार्या लॅपटॉप / डेस्कटॉप वरून तुमच्या गूगल अकॉऊंटला लॉग-इन करून तुमचा अँड्रॉईड फोन तुम्ही स्वतःच लॉक करू शकता. अर्थात, तो फोन तेव्हा इंटरनेटला जोडलेला असला पाहीजे. (MI वाल्यांनाही तेव्हाच तुमचा डेटा रीकव्हर करता आला असणार.)
[उशिरा प्रतिक्रिया दिल्याबद्दल क्षमस्व. तुमचा फोन आत्तापर्यंत मिळालेला असो किंवा त्याचा उपयोग तुम्हाला हानी पोहोचवायला होऊ नये, ह्याबद्दल सदिच्छा !]