संगीतक हे नवे - कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद
Submitted by कविन on 14 September, 2016 - 03:46
सीन:
गणपती विसर्जनाचा दिवस.... स्टाफ़ गेलाय सुट्टीवर..... आदमी १ टेबल ३ ..बहोत नाईंसाफी है रे भाय! पर करे क्या...नाईलाज को क्या ईलाज... काम देई दाम आणि दाम करी काम च्या चक्रात अडकलेय ही दुनिया.... त्यातुन बॉस माझा पक्का बनिया. काम तर व्हायलाच हवं, घरीही लवकर जायलाच हवं. काय बाई करु? कस्सं मी करु? काही कळेना ..मला सुचेना
मला जायचऽऽय लवकर
साऽहेब म्हणतोऽऽ काम कर
असिस्टंट गेलाऽऽय सुट्टीवर
शिपाई पडीकऽ व्हॉटस ऍप वर
सीन: साहेबाची इमेल आली...वाचून माझी त्रेधा उडली..केबीन मधे लगोलग फ़ाईल घेऊन स्वारी गेली.
सायबाचं एकच टुमणं..
साहेब म्हणतो काम कर
शब्दखुणा: