तरही - नुकतीच पावसाला सुरुवात होत आहे
Submitted by भरत. on 8 August, 2016 - 06:58
नुकतीच वादळाला सुरुवात होत आहे
भलताच प्रश्न कैसा गुजरात होत आहे
दुथडी भरून वाहे सरिताच काळ झाली
वाहून पूल गेला अपघात होत आहे
सांडून रक्त ज्यांनी स्वर्गास निर्मिलेले
त्यांची रवानगीही नरकात होत आहे
ज्वालामुखी म्हणोनी जगतात ख्यात आहे
पण आजकाल त्याची फुलवात होत आहे
सगळेच कर्ज माझे बुडणार हाय भासे
शिरजोर आज मल्ल्या मुदलात होत आहे
मज छंद वाटलेला बघ नाद आज झाला
परिणाम काय त्याचा खर्चात होत आहे
तुलसीस वाटलेले पढवीन यांस पाढे
पण तीच मग्न आता कपड्यांत होत आहे
विषय:
शब्दखुणा: