Submitted by भरत. on 8 August, 2016 - 06:58
नुकतीच वादळाला सुरुवात होत आहे
भलताच प्रश्न कैसा गुजरात होत आहे
दुथडी भरून वाहे सरिताच काळ झाली
वाहून पूल गेला अपघात होत आहे
सांडून रक्त ज्यांनी स्वर्गास निर्मिलेले
त्यांची रवानगीही नरकात होत आहे
ज्वालामुखी म्हणोनी जगतात ख्यात आहे
पण आजकाल त्याची फुलवात होत आहे
सगळेच कर्ज माझे बुडणार हाय भासे
शिरजोर आज मल्ल्या मुदलात होत आहे
मज छंद वाटलेला बघ नाद आज झाला
परिणाम काय त्याचा खर्चात होत आहे
तुलसीस वाटलेले पढवीन यांस पाढे
पण तीच मग्न आता कपड्यांत होत आहे
नजरेत काय सांगू भलतीच गोड जादू
दिवसाच चांदण्याची बरसात होत आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नजरेत काय सांगू भलतीच गोड
नजरेत काय सांगू भलतीच गोड जादू
दिवसाच चांदण्याची बरसात होत आहे>> हा आवडला.
है शाब्बास! गझलेच्या
है शाब्बास!

गझलेच्या प्रांगणात स्वागत!
साती, माझ्या नावावर याआधीच
साती, माझ्या नावावर याआधीच दोन गझला आणि दोन गझलानुवाद जमा आहेत. जेव्हा लेखन अप्रकाशित करायची सोय होती, तेव्हाच्या काळातल्या. त्यामुळे कदाचित अप्रकाशित केल्या असतील.
बाकी हे जे काय लिहिलंय, त्याचं श्रेय तुमच्या पापडांना.
छ्हान
छ्हान
लई भारी!
लई भारी!
३रा, ४था, ८वा जरा ज्यास्तच
३रा, ४था, ८वा जरा ज्यास्तच आवडले
या शेरात अलामत भंगली होती
या शेरात अलामत भंगली होती म्हणून तो वगळलाय
उमजून आज छत्री विसरून जात आहे
नुकतीच पावसाला सुरुवात होत आहे
मूळ ओळीबद्दल बेफिकीर यांचे मनःपूर्वक आभार.
नजरेत काय सांगू भलतीच गोड
नजरेत काय सांगू भलतीच गोड जादू
दिवसाच चांदण्याची बरसात होत आहे>>>>> मस्त.