श्री संतराम (भाग ६ वा)
Submitted by मिरिंडा on 7 August, 2016 - 07:56
सोमू आणि त्याचे सहकारी यांनी आत शिरल्या शिरल्या प्रथम ब्राह्मण वेष काढून ठेवले. डोक्यावर बांधलेले खोट्या जटांचे बुचडेही काढले. नेहमींच्या लढाऊ वेषात ते तयार झाले. ते उतरलेला भाग तसा अंधारलेलाच होता. शेवटी तो जमिनीखालचा भाग होता. चढ उतार असलेली जमीन केवळ सरावलेल्या माणसाला जाण्यासारखी होती. अंधुक प्रकाशात हळू हळू डोळे सरावले. त्यांना आता दूरवर एक दगडी कमान असलेले मुख्य प्रवेशद्वार दिसले. अर्थातच ते बंद होते. तिथे होते पंडिताने बांधून घेतलेले कारागृह. त्यात वेगवेगळे राजकीय अधिकारी जे पंडिताच्या मोहाला न भुललेले आणि ज्यांचे रुपांतर त्याने पशू पक्ष्यांमध्ये केले होते.
शब्दखुणा: