संतरामांची कुटी शोधणं ........

श्री संतराम (भाग ५वा)

Submitted by मिरिंडा on 12 July, 2016 - 06:48

संतरामांची कुटी शोधणं किस्त्रीसाठी कठीण नव्हतं. पण तिने ज्या कुणाला विचारले त्याला असे वाटले की समोर नक्की स्त्रीच उभी आहे, की एखादी कृत्या . त्यामुळे तिला पाहताक्षणी सेवक आणि सेविका व इतर विद्यार्थी बाजूला होऊ लागले. तरीही संतरामांची कुटी ज्या दिशेला होती तिथे खूण करून तिला त्या व्यक्तीने दाखवले. साधारण कुटी, जिच्या आजू बाजूला सुगंधी पुष्पांच्या लता वेली पसरल्या होत्या. त्यामुळे वातावरणाच्या पवित्रतेला एक प्रकारचा दैवी स्पर्श लाभला होता. किस्त्री कितीही जरी राजकारणाच्या खेळात धुरंधर असली तरी तिला असं पबित्र व दैवीवातावरण कोणत्याही संत माहात्म्याच्या भोवती अनुभवायला मिळाले नव्हते.

Subscribe to RSS - संतरामांची कुटी   शोधणं ........