स्वेच्छा गेल्यावर नगरात एक दवंडी ............

संतराम (भाग चौथा)

Submitted by मिरिंडा on 25 June, 2016 - 06:58

स्वेच्छा गेल्यावर नगरात एक दवंडी पिटवण्यात आली. ती अर्थातच सुदेश पंडिताकडून होती. आणि ती राजधानी मध्ये पिटण्यात पंडिताचा विशिष्ट हेतू होता. प्रजाजन आणि राज महालातील महाराज धरून सर्वच राजकारणी पंडिताच्या लग्नाच्या विचारामध्ये मग्न राहतील आणि मग आपल्याला आपला गुप्त हेतू साध्य करता येईल. तसेच दुसऱ्याच दिवशी स्वेच्छेचे अपहरण झाल्याची भुमका उठवली की झालं. म्हणजे आणखी एक चर्चेला विषय निर्माण होईल. एकामागे एक अश्या दोन घटना घडवल्यावर लोकांना विचार करून कृती करण्याची संधीच मिळणार नाही ही त्याची योजना होती.

Subscribe to RSS - स्वेच्छा गेल्यावर नगरात एक दवंडी ............