प्रातिभा ( भाग ६वा )
Submitted by मिरिंडा on 22 June, 2016 - 05:10
आतले आवाज न संपल्याने माझेही कामात लक्ष लागेना. काहीतरी करायचे म्हणून मी क्लायंट लिस्ट वाचायला घेतली. पण माझे सगळे लक्ष केबीन मधल्या आवाजांकडे होते. मला थोडी ही पण भीती होती, की मला आत बोलावले तर काय करायचे. तेवढ्यात माझ्या खांद्यावर हात पडला. मी गर्रकन वळून मागे पाहिले. एक हवालदार माझ्याकडे पाहत होते. ते माझ्या जवळच्याच खुर्चीवर बसले. मला म्हणाले, " काय नाव तुमचं? . " मी संशयाने त्यांच्याकडे पाहिले. ते म्हणाले, " अहो घाबरता काय? मी काय तुम्हाला पकडून नेतोय का? " माझ्या चेहऱ्यावरचे तणावाचे भाव थोडे कमी झाले असावेत. मी माझं नाव सांगितलं.
शब्दखुणा: