तृप्तीचा ढेकर

तृप्तीचा ढेकर

Submitted by स्वप्नाली on 25 April, 2016 - 16:04

मार्चमधले दुपारचे टळटळीत ऊन हा हा म्हणत होते (मला तरी आज पर्यंत तसे ऐकू आलेले नाही कधी)..जेवणाच्या मोठ्या सुट्टी नंतरचा पहीलाच जीव-शास्त्राचा तास म्हणजे आमच्या जीवाला घोर. त्यात आज आज्जीच्या हातची "सुग्रास" का काय म्हणतात तशी भरली वांगी. मग काय विचारता, मीच नाही तर आम्या-सुम्या, भाल्या सगळेच तुटून पडतात डब्यावर माझ्या..आज्जीला हे माहीत असल्याने ती सुद्धा डब्बा भरताना जरा हात मोकळाच ठेवते..सोबत एका छोट्या डबी मध्ये श्रीखंड दिले असले तर मग "ब्रम्हानन्दी" टाळीच ! ते बोटानीच सगळे चाटून-पुसून खाउन, नळावर हात धुवून रूमालाला पुसून वर्गात येऊन बसलो होतो..

Subscribe to RSS - तृप्तीचा ढेकर