दार्जीलिंग सहल - भाग २ - रॉक गार्डन
Submitted by दिनेश. on 9 March, 2016 - 06:28
दार्जीलिंग सहल - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/57963
दार्जीलिंग सहल - भाग १ प्रयाण आणि डेकेलिंग रिसॉर्ट http://www.maayboli.com/node/57965
आम्ही मुंबईहून अगदी पहाटेच निघालो होतो आणि तो सर्व दिवस प्रवासातच गेला होता, त्यामूळे दुसर्या दिवशी जरा निवांत उठायचे असे ठरवले होते. पण तिथले वातावरण एवढे जादुई होते कि अंथरुणात लोळणे मला रुचण्यासारखेच नव्हते.
रात्रीची फायरप्लेस बराच वेळ जळत होती, शिवाय हीटरही होता, त्यामूळे छान झोप झाली. अंघोळीलाही गरम पाणी मिळाले ( या सर्व गोष्टी तिथे अत्यावश्यक आहेत, काही हॉटेल्स त्या देऊ शकत नाहीत. )
शब्दखुणा: