'पद्मदुर्ग माहीत आहे का ??'
'नाही'
'जंजिरा ??'
'हो तर.. अजिंक्य राहीलेला किल्ला ना.. शिवाजी राजेंना पण तो किल्ला जिंकता आला नव्हता..'
'गेला आहेस कधी ?'
'हो'
'मग त्या किल्ल्यावरुन समुद्रात दुर बेटावर अजुन एक किल्ला दिसतो तो पद्मदुर्ग'
' अरे हा.. तो छोटा किल्ला... आलं लक्षात.. पण तिथे तर पाहण्यासारख काहीच नाहीये अस गाइड सांगत होता..!!'
'तो कोणी बांधला आहे माहित आहे का ?'
'नाही.. पण जंजिरा सिद्दीने बांधलाय हे नक्की'
पेणला चुलत भावाचे लग्न होते. जातोच आहोत तर तेथून जवळ असलेला जंजिरा किल्ला पाहण्याचा मोह आवरेना. शनिवारी सकाळीच पुणे-मुंबई जुन्या द्रुतगती मार्गावरून खोपोलीला आलो. तेथून अष्टविनायकापैकी एक असलेल्या पालीच्या गजाननाचे दर्शन घेऊन रोह्याला गेलो. पाली-रोहा-नागोठाणे-साळाव-नांदगाव मार्गे मुरुडला जाता येते मात्र, साळवला न जाता वाटेत डावीकडे असणाऱ्या फणसाड अभयारण्यातून सुपेगावमार्गे गेलो. एव्हाना दुपारचे १२.३० वाजले होते. सुपेगावमार्गे जाण्याचा माझा हा तिसरा अनुभव होता. वाटेत फणसाड अभयारण्य स्वागत करते. सोबतीला गुगल मॅपची मदत होतीच. त्यामुळे वाट चुकण्याचा प्रसंग नव्हता.