जिथे ना कुणीही कवीच्या मनाचा...
Submitted by गणेश कुलकर्णी on 6 January, 2016 - 07:12
जिथे ना कुणीही कवीच्या मनाचा...
तिला त्रास होतो महालात आता
रमो ती इथे याच खोलीत आता
तुम्ही त्यास शोधा मठी मंदिरीही
मला तो दिसे मात्र आईत आता
जरा थांब दोस्ता कशाला मरावे
बदलणार सरकार केंद्रात आता
अता औषधाला न माणूसकीही
असे ती कदाचीत प्राण्यात आता
जिथे ना कुणीही कवीच्या मनाचा
अशा जन्मलो मी घराण्यात आता
~ समीप
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा: