सागराशी जुळले नाते
Submitted by मीना उत्तरा on 22 June, 2019 - 11:01
पृथ्वी स्वतःभोवती फिरते. समजा एका विमानाने (न जाणो त्याच्या खाण्यात काय आले!) जमिनीशी एकदम काटकोनात सरळ रेषेत उड्डाण केले आणि काही किलोमीटर उंचीवर जाऊन (उदा. ५ किमी उंचीवर एका बिंदूशी) ते स्थिर झाले, (ना आगे, ना पिछे, ना उपर, ना नीचे) तर ते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दुरावलेल्या अवस्थेत राहील. मग ते बराच वेळ असेच राहिले तर स्वतःभोवती फिरणार्या पृथ्वीचा पृष्ठभाग विमानाच्या खालून पुढे सरकत राहील का?