आपण काय करता ? जरा मराठीत सांगाल ?
आपल्या देशात सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपला अनेकांशी सबंध येतो. त्यापैकी काहीजण मराठी भाषिक असतात. बोलण्यासाठी समभाषिक माणूस मिळाल्यास आपल्याला आनंद होतो व त्याच्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्याला हुरूप येतो. एखाद्याची नव्याने ओळख झाल्यास आपण प्रथम त्याचे नाव व गाव विचारतो. त्यानंतरचा स्वाभाविक प्रश्न असतो, ‘’आपण काय करता?’’ त्यातून आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या नोकरी अथवा व्यवसायासंबंधी जाणून घ्यायचे असते. माझा अनुभव असा आहे की वरील प्रश्नाचे उत्तर हे बहुतांश वेळा सरळ मराठीतून मिळत नाही.