अकरा ..साप्ताहिक दिवाळी अन्क

भय

Submitted by भुईकमळ on 26 November, 2014 - 08:44

अलीकडे फार भिती वाटू लागलीय
या शहराबद्दल,भोवतालाबद्दल
अगदी स्वत:बद्दलही
जसे माझे अस्तित्व
प्रत्यारोपण केलेल्या अवयवासारखे
अचानक बगावत करेल
या शहराच्या देहसंस्थेशी
आणि माझ्याही नसानसातून
वाहत राहील
एक अनोळखी काळपट रक्तप्रवाह
अद्रूष्टाचा करपट वास घेऊन...
भिती स्वप्नातूनही रस्ता ओलांडतानाही
की रोरावत येईल कुठूनही
मानवी लाटेचा एक विकृत लोंढा नी
मलापण वहावत रहाव लागेल अनिच्छेनेच
त्यांच्या धर्माच्या कालविसंगत
पाखंडी सनातन व्याख्येतून ...
अलिकडे मात्र एक विचित्रच भिती
भिनू लागलीय शहराच्या श्वासातून

Subscribe to RSS - अकरा  ..साप्ताहिक दिवाळी अन्क