चर्चिल मार्क्स आईनस्टाईन माओ मोदी शाह पवार लालू नीतीश ओबामा मायबोली निकाळजे रॉबीनहूड इ.

आईनस्टाईनने माझा स्टोव्ह पळवला

Submitted by हेमाशेपो. on 8 November, 2015 - 22:08

आईनस्टाईनने माझा स्टोव्ह पळवला
तेव्हां
चर्चिल घासलेटच्या साठ्यावर
फणा काढून उभा होता
मी मार्क्सला म्हटलं
पेटवायचं कसं ?
त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला
सगळंच विझलंय
अगदी माओचीही राख झाली
आता इंद्रायणीतून
भिजलेली गारगोटी काढून त्यावर
अभंगांची शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न करतोय
मात्र उजवीकडून येणारा
मुसळधार भगवा पाऊस म्हणाला
रांडेच्या, बघतोच तुला
एव्हढ्य़ाचसाठी रोखून धरलेलं कधीचं
एका चकमकीसाठी प्राण डोळ्यात आले असताना
पुरूष कानात कुजबुजला
माणसं पेटवतोस का ?
गॅस सिलिंडर्स देईन, फुकटात
लागतील तेव्हढे !
फक्त त्या आगीत घाल
सगळे ज्वलनशील ग्रंथ
आणि माझं सूक्तही

Subscribe to RSS - चर्चिल मार्क्स आईनस्टाईन माओ मोदी शाह पवार लालू नीतीश ओबामा मायबोली निकाळजे रॉबीनहूड इ.