Submitted by हेमाशेपो. on 8 November, 2015 - 22:08
आईनस्टाईनने माझा स्टोव्ह पळवला
तेव्हां
चर्चिल घासलेटच्या साठ्यावर
फणा काढून उभा होता
मी मार्क्सला म्हटलं
पेटवायचं कसं ?
त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला
सगळंच विझलंय
अगदी माओचीही राख झाली
आता इंद्रायणीतून
भिजलेली गारगोटी काढून त्यावर
अभंगांची शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न करतोय
मात्र उजवीकडून येणारा
मुसळधार भगवा पाऊस म्हणाला
रांडेच्या, बघतोच तुला
एव्हढ्य़ाचसाठी रोखून धरलेलं कधीचं
एका चकमकीसाठी प्राण डोळ्यात आले असताना
पुरूष कानात कुजबुजला
माणसं पेटवतोस का ?
गॅस सिलिंडर्स देईन, फुकटात
लागतील तेव्हढे !
फक्त त्या आगीत घाल
सगळे ज्वलनशील ग्रंथ
आणि माझं सूक्तही
माझा नाईलाज झालेला
सांगायला पाहीजे का ?
- हेमा शेखर पोतदार
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
कुठूतरी वाचली होती ही अर्थात
कुठूतरी वाचली होती ही
अर्थात तुमचीच असणार म्हणा!
त्याही वेळी भन्न्नाट वाटली होती आणि आताही
कुठेतरी वाचल्यासारखी वाटते.
कुठेतरी वाचल्यासारखी वाटते. प्ररित आहे का?
६० ? ९० ? १८० ?
६० ? ९० ? १८० ?
झाकून ठेव रे कविता. काव्य चोर
झाकून ठेव रे कविता.
काव्य चोर येऊन घेऊन जाइल.
http://www.misalpav.com/node/
http://www.misalpav.com/node/33580
याबद्दल का? निर्लज्जपणाला इलाज आहे का?
स्पार्टा चे मित्र आहेत ते.
स्पार्टा चे मित्र आहेत ते. त्यांनी फक्त 'कल्पना' उसनी घेतली आहे, पहा शब्द आहेत कि नाहीत वेगळे! तुम्ही उगीचच बिचाऱ्यांना बोल लावता आहात.
भट्टी छान जमली आहे!
भट्टी छान जमली आहे!
स्पार्टा कुठुन आला ?
स्पार्टा कुठुन आला ?
हेमाशेपो कविता आवडली
हेमाशेपो कविता आवडली
जव्हेरगंज, रिकामी डोकं आणि
जव्हेरगंज, रिकामी डोकं आणि सचिन पगारे धन्यवाद.
कविता आवडली.
कविता आवडली.
बाळाजीपंत | 9 November, 2015
बाळाजीपंत | 9 November, 2015 - 00:03
कुठेतरी वाचल्यासारखी वाटते. प्ररित आहे का? >>>
या प्रतिसादानंतर अन्यत्र मंदार दिलीप जोशी यांनी या रचनेशी साधर्म्य दर्शवणारी कविता पोस्ट केली आहे. इथे ज्या पद्धतीने विचारणा केली आहे त्यामुळे असे वाटते आहे की ही कविता चोरीची आहे कि काय !!
त्यामुळे मंदार दिलीप जोशी यांणा अन्यत्र त्यांच्या कवितेवर या कवितेचा संदर्भ देऊन प्रश्न विचारला होता की कुठली प्रेरित आहे. त्यावर त्यांनी अपेक्षेप्रमाणे शिवीगाळ केली आणि वर माझ्या ब्लॉगवरून तुम्ही चोरली असेल असं उर्मट उत्तर दिलं आहे.
त्याच संस्थळावर ही कविता दि. ७ जुलै रोजी पोस्ट झालेली आहे. जोशीबुवांच्या निर्वासीत संस्थळावर प्रथम पोस्टींगचीही तारीख आहे दि. १२ ऑगस्ट. १२ ऑगस्ट रोजी प्रकाशित केलेली कविता सात जुलै रोजी कशी काय प्रेरित असू शकते या प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये.
ही चोरी उघड झाल्यानंतर केलेली सारवासारव बालीश तर आहेत पण निर्लज्जपणाचा कळस आहे. वर वाहत्या पानावर अनेक महीने कविता होती, तिथून चोरली असा नवा आरोप केला आहे. त्या टिनपाट पानावर कशाला कोण जाईल. शिवाय वाहत्या पानावर अनेक महीने कविता राहणे म्हणजे च मत्कारच की !!
मूळ कवितेवर प्रेरित आहे का असा प्रश्न विचारण्याचा निर्लज्जपणा दर्शवल्याने त्या संस्थळावर अधिकृत तक्रार करण्यात येत आहे तर इथे ड्युआयडीद्वारे दिलेल्या शिव्यांबद्दल तक्रार करण्यात येत आहे.
या उप्पर या विकृत माणसाच्या नादी लागण्यात स्वारस्य नाही.
अनुमोदन. दोन्ही संस्थळानी
अनुमोदन.
दोन्ही संस्थळानी योग्य ती कारवाई करावी.
( पण आजवरचा इतिहास बघता त्याना संरक्षणच मिळेल कदाचित . )
धन्यवाद मोगाजी.
धन्यवाद मोगाजी.
पुणेरी बाजीरावाने माझी कविता
पुणेरी बाजीरावाने माझी कविता पळवली
तेव्हां
काव्यगुरु निकाळजे शनवार वाड्यावर
गजला करत उभा होता
बाजी बोलला
जमवायचं कसं ?
त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला
सगळंच विझलंय
अगदी गझल कार्यशाळेचीही राख झाली
आता मायबोली सर्चमधून
तेच तेच जुने मतले काढून
राजकारणाचे धागे पेटवण्याचा प्रयत्न करतो.
...
मात्र उजवीकडून येणारा
याकुबचा जनाजा म्हणाला
भगविच्या , बघतोच तुला !
एव्हढ्य़ाचसाठी रोखून धरलेलं कधीचं
एका काफियासाठी प्राण डोळ्यात आले असताना
पन्नास हजार हिरवे कानात कुजबुजले
तुझ्या सम्मेलनात इतकी माणसं जमतात का?
मतले आणि काफिये फुकटात देइन
उर्दू साहित्यातून.
बाजी बोलला... गुरू , दोघंही काव्यढापूच
तुम्ही उर्दू मी मराठी !
माझा नाईलाज झालेला
सांगायला पाहीजे का ?
.....
ता . क. हे ओरिजिनल काव्य नाही.
मोगा काल निकाळजे मानभावीपणा
मोगा
काल निकाळजे मानभावीपणा करत होते. त्या प्राध्यापकांवर जमीन चोरल्याचा आरोप ठेवणारी मुक्ताफळं आणि त्यासाठी हा आयडी संस्थळावरून घालवणारच अशी केलेली भीष्मप्रतिज्ञा ( पितामह माफ करा) याचं स्मरण करून द्यावं का ?
त्या मंद जोश्याचं मनावर घेऊ
त्या मंद जोश्याचं मनावर घेऊ नका. अधू डोक्याचा मधू आहे तो.
तो नेहमीच गांडूळासारखा वळवळतो पण त्याला स्वतः ड्रॅगन असल्याची स्वप्नं पडत असतात. त्यामुळे तो फ्रस्ट्रेटेड आहे.
विकृत आयडी आहे.
विकृत आयडी आहे.
ज्यांना कवितेतील ओ कि ठो कळत
ज्यांना कवितेतील ओ कि ठो कळत नाही त्यांनी इथे न पाजळण्याबद्दल मनापासून आभार !
प्रतिसादातला इतिहास समजला
प्रतिसादातला इतिहास समजला नाही.
कविता आवडली.
कविता आवडली. त्यातले राजकीय
कविता आवडली. त्यातले राजकीय सामाजिक संदर्भ योग्य ठिकाणी आले आहेत.
इंद्रायणीतून भिजलेली गारगोटी आणि अभंगांची शेकोटी ही मेटॅफोर्स खास करून आवडली.