सौसुमी चटर्जी

सदाबहार रसदार अंगूर

Submitted by निनाद on 2 November, 2015 - 19:27

देवेन वर्मा आणि संजीव कुमार या जोडीचा अंगुर हा चित्रपट.
गुलजार यांचे सदाबहार आणि चुरचुरीत संवाद हे या चित्रपटाचे बलस्थान.
संवाद आणि घडामोडी यांचे पंचेस इतके सुरेख विणलेला हा चित्रपट आहे.

पण तेव्हढेच नाही तर त्या संवादास पूरक ठरतील अशी अगदी नेटकी बेतलेली पात्रे. त्या पात्रांचे नितांत सुंदर त्या त्या भूमीकेला न्याय देणे. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ विनोदी अभिनेता म्हणून देवेन वर्मा यांना फिल्मफेयर मिळाले होते. पण माझ्या मते हे सर्व टीमला मिळाले असते तरी चालले असते इतका छान हा चित्रपट जमून आला होता.

या चित्रपटाच्या पंख्यांना चर्चा करायला, काय आवडले होते अशा आठवणी जागवायला हा धागा.

विषय: 
Subscribe to RSS - सौसुमी चटर्जी