गोष्ट एका बजेटची
गोष्ट एका बजेटची
हुबालवाडी गावात एक मध्यमवर्गीय कुटुंब होते. तस पाहिलं तर जेवून खाऊन सुखवस्तू असणाऱ्या पैकी हे एक कुटुंब. स्वतःचे तीन खोल्यांचे राहत घर. शासकीय अनुदानातून शौचालय बांधून घेतलेलं. दोन मुलं त्यांच्या बायका, दोन मुली अन गण्या व गंगी अस आठ जणांचं दणदणीत कुटुंब. घरात टीव्ही, डायनिंग टेबल, वॉशिंग मशीन या साऱ्या सुविधा. दोन्ही मुलं कमावती. दोन मुली कॉलेजमध्ये शिकणाऱ्या. पैका अमाप मात्र खर्चाच्या बाबतीत कुणाचा कुणाला पायपोस नव्हता. गण्या व गंगी इचार करायची की इतका पैका मिळून तो पुरत कसा नाय.