कुठेतरी खूप दूरवर मी
Submitted by बेफ़िकीर on 28 September, 2015 - 05:12
कुठेतरी खूप दूरवर मी मुळे स्वतःची पुरून आलो
कुणी न जाणे कुठून आलो, कुणी न जाणे कुठे निघालो
पुढारलेल्या विसंगतींशी अनेकवेळा विवाह केला
पुन्हा घटस्फोट होत गेले, पुन्हा पुन्हा मी जुनाट झालो
चकाकणार्या इमारती पोसल्यात इंग्लीश टोमण्यांवर
भडाभडा भांडतात जे त्या विषण्ण वाड्यांकडे पळालो
निरभ्र आकाश श्रावणाचे नवीन दुष्काळ देत गेले
क्षितीज काळे बघून मी त्या दिशेस आक्रंदुनी उडालो
हरेकजण 'बेफिकीर' होवो, अशी सवय ह्या जगास लागो
'कुणी मला तुच्छ लेखले की लगेच मी वाहवा म्हणालो'
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा: