काल संध्याकाळपासून व्हॉटसप सर्वर डाऊन आहे. गूगल केले तर समजतेय बहुधा ग्लोबली सर्वर डाऊन आहे. तुमच्याकडे आहे की नाही कल्पना नाही. पण काल संध्याकाळी टीव्हीवर आयपीएलची मॅच बघता बघता मोबाईलवर व्हॉटसप ग्रूपमधील मित्रांशी क्रिकेटची चर्चा करत असताना अचानक माझे मेसेज जायचे बंद झाले. लोकांचे यायचे बंद झाले. मला वाटले आपला इंटरनेट इश्यू असावा. नेट बंद केला. चालू केला. मोबाईल रिस्टार्ट केला. प्रॉब्लेम जैसे थे च!
"निल्या हल्ली फेसबुकावर नाही का? त्याला परवा टॅग करायचा होता तर सापडलाच नाही."
"अरे जाम घोळ झाला रे. निल्या त्याच्या जर्मन साहेबाच्या बायकोच्या बरियलला गेला होता त्याचे रिकामटेकडे रुममेट घेऊन.त्याला ग्रुप टिकेट काढून पैसे वाचवायचे होते.तर म्हणाला तुम्हीपण चला. त्यांना तिथे काही उद्योग नव्हता त्यांनी त्या रम्य दफनभूमीत पंचवीसेक फोटो काढले आणि त्यात टॅग केला ना निल्याला 'फिलींग हॅप्पी अॅट रोझेनहाईम ग्रेव्हयार्ड' म्हणून. त्याला २५० लाईक मिळाले आणि निल्याचा साहेबच होता फ्रेंडस लिस्ट मध्ये. निल्याने आता कानाला खडा लावून फेसबुक संन्यास घेतलाय काही दिवस."