लंगडा भिंगाऱ्या

लंगडा भिंगाऱ्या

Submitted by जव्हेरगंज on 28 August, 2015 - 09:04

अंधारायला आलं होतं.
लंगडा भिंगाऱ्या वैरण घेउन आला.
आण्णा नांगरटीला गेला होता .
मंजु भाकऱ्या थापत होती .
लंगडा भिंगाऱ्यानं वैरण कापून गुरांना टाकली .
पोरं पडवीत शाळेतला गृहपाठ करत होती .
वैरण टाकून भिंगाऱ्या दिवसभराचा थकवा काढायला अड्यावर गेला .
दोन गलास रिकामे करुन पुन्हा झोकांड्या खातच घरी आला.
मंजुनं त्याला भाकर कालवण दिलं.
त्यानं ते पडवीत बसून खाल्लं.
भिंगाऱ्या एका पायान लंगडा असला तरी रेड्यासारखं काम करायचा.
चार गुरांचा चारा एका खेपेत आणायचा.
माजघरातील सतरंजी उचलून तो व्हरांड्यात येऊन पसरला.
त्याची नेहमीची गौळत म्हणत तसाच पडून राहिला.
तो गौळणी कुठे शिकला देवजाणे.

Subscribe to RSS - लंगडा भिंगाऱ्या