* बर्याच जणांना असे का नाव दिलंय असा प्रश्न पडला असल्याने थोडे त्याविषयी. कॉसमॉस दरवर्षी न चुकता नवरात्राच्या सुमारास फुलते. कुणीही याची झाडे मुद्दाम लावत नाहीत. वर्षभर जमीनीखाली राहुन एकदाच डोके वर काढते व सर्व परिसर केशरी करुन टाकते.
भाग्ययोग - सिल्व्हरबिल....
बहुतेक दोन - तीन वर्षापूर्वी असेल..... अशाच थंडीच्या काळात ऑफिसमधे या सिल्व्हरबिल महाशयांशी गाठ पडली.
माझ्या ऑफिसच्या बाहेरच छान लॉन, थोडी झाडे, झुडपे आहेत. मध्यम उंचीच्या मयूरपंखीच्या (मोर पंखी /थुजा ) झुडपात स्पॉटेड मुनिया, व्हाईट रम्प्ड मुनिया विणीच्या हंगामात कायम घरटी करण्यात मग्न असतात. चोचीत एखाद्या गवताचे पाते घेऊन जाताना फारच गंमतीशीर दिसतात हे मुनिया. हिरव्या गवताचे छान गोल गोल घरटे करतात हे. आसपास अॅशी, बुलबुल, चिमण्या, कावळे तर कधी धोबी (वॅगटेल), भारद्वाजही असतात.