कुणी जाल का
Submitted by मित्रहो on 8 June, 2015 - 09:37
काही वर्षापूर्वीचे गोष्ट आहे त्यावेळेला डीजीटल कॅमेरे नुकतेच आले होते. काढलेला फोटो लगेच दिसणे ह्या गोष्टीचे फार अप्रूप होते. त्यावेळेला पर्यटन स्थळी डिजीटल कॅमेरा गळ्यात घालून फिरणे हे प्रतिष्ठेचे लक्षण होते. मी काही कामानिमित्त गोव्याला गेलो होतो, एकटाच होतो. काम झाल्यावर पणजी जवळील मिरामार बीचवर बसलो होतो. सुरेख संध्याकाळ होती, सूर्य मावळत होता, तो तांबडा रंग पाण्यावर दिसत होता. गार हवा सुटली होती. अशा रम्य संध्याकाळी, अशा रम्य ठिकाणी एक नुकतेच लग्न झालेले जोडपे आले होते. हनीमुनला आले असावे. त्या बुवाला कदाचित तिचा पावलांपर्यंत पाणी असलेला फोटो घ्यायचा होता परंतु समुद्र मस्तीत होता.
विषय:
शब्दखुणा: