पावसाचं आणि आपल्या केशरी देठाच्या नाजूक पांढऱ्या शुभ्र फुलांचं सारं वैभव धरणीमातेला अर्पण करणाऱ्या पारिजातकाचं माझ्या मनात अगदी घट्ट नातं आहे . काळ्या भोर डांबरी रस्त्यावर पावसाची फुलं उमलू लागली की पारिजातकाच्या सगळ्या आठवणी माझ्या मनात दाटी करतात ... न चुकता .. दरवर्षी .
नमस्कार मंडळी..
जुलैचा दुसरा आठवडा ते ऑगस्ट या दरम्यान कधीतरी ९-१० दिवस सुट्टी घेवून अमृतसर भटकण्याचा विचार सुरू आहे.
सध्या ठरलेला आराखडा म्हणजे पुण्यातून अमृतसर पर्यंतचा रस्ता दुचाकीने पार करणे व जालीयनवाला बाग, वाघा बॉर्डर*, सुवर्ण मंदिर तसेच राजस्थानातील वाटेत असणार्या ठिकाणांना भेटी देणे इतकाच आहे.
एकूण ३ दुचाकींवर ३ जण जाण्याचे ठरवत आहोत. पुणे - अमृतसर - पुणे असा साधारणपणे ४००० किमीचा संपूर्ण प्रवास दुचाकीनेच होणार आहे. साधारणपणे ६ दिवस संपूर्ण प्रवासात जातील व ४ दिवस अमृतसर व वाटेतली ठिकाणे बघण्याचे ठरवत आहोत. राखीव दिवसही गृहीत धरले आहेत.