ब्रिटनचे ऋतुमान
Submitted by सुमुक्ता on 11 May, 2015 - 04:07
ब्रिटनचे हवामान निराशाजनक आहे असे सांगणारे अनेक लोक भेटतील. वर्षभर कधीही पडणारा पाऊस, थंडी, वारे, क्वचितच घडणारे सूर्यदर्शन अशा प्रकारचे निराशाजनक चित्र आम्ही ब्रिटनमध्ये येण्याआधी खूप लोकांनी रंगवून सांगितले होते. त्यात आम्ही स्कॉटलंडला राहणार म्हणजे अजूनच उत्तरेकडे त्यामुळे अजूनच वाईट. आम्ही मनातून खूप घाबरलो होतो. ठरवले होते की एकच वर्ष राहू आणि मग दुसरीकडे जाऊ. पण जसेजसे आम्ही इथल्या लोकांशी, इथल्या संस्कृतीशी जुळवून घेऊ लागलो तसे इथल्या हवामानाशी पण जुळवून घेऊ लागलो . आणि आता तर इतकी वर्षे झाली; आम्ही स्कॉटलंडच्या प्रेमात आहोत.
शब्दखुणा: