सुगंधा - भाग २
Submitted by कविता१९७८ on 7 April, 2015 - 06:09
अमोघला तातडीने इस्पितळात नेण्यात आले, पायाला फ्रॅक्चर झाले होते, ऑपरेशन करणे गरजेचे होते, तीने लगेचच फोन करुन कळवल्याने आईवडील ही कोल्हापुरला यायला निघालेच होते, तीचा मामा देखील गावाहुन निघाला. मावशी आणि तिचा मुलगा धक्क्यातुन सावरले नव्हते तरीही तिच्या बरोबरच इस्पितळात होते, तिने धावपळ करुन इस्पितळातले सोपस्कार पार पाडले. अमोघच्या ऑफीसमधे कळवुन तिने रजा वाढवुन घेतली. अमोघचे ऑपरेशन झाले, पायात रॉड बसवला गेला.
विषय:
शब्दखुणा: