जाताना :)

जाताना :)

Submitted by भारती.. on 7 April, 2015 - 04:00

जाताना..

प्रखरतेचे पांघरत झाकोळ जाताना
गुणगुणावी गहनतेची ओळ जाताना

साजरा होता ऋतू रेशीमकिरणांचा
धाडला त्याने विजेचा लोळ जाताना

कारणास्तव कोणत्या आलो इथे होतो
आठवांचा निस्तरेना घोळ जाताना

हे कथानक एकदिश जर टाळणे जमले
आडवाटा आणि गल्लीबोळ जाताना

शांततेतच ‘भारती’ आयुष्य सरलेले
हा कशाला शेवटी कल्लोळ जाताना ..

-भारती बिर्जे डिग्गीकर

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - जाताना :)