"प्रवासी...." ~ जी.ए.कुलकर्णी
"बेळगांव नावाच्या गावास....पावले जरी दूर भटकत गेली तरी तुझ्या जुन्या आठवणींची बुत्ती सतत जवळ राहिली आहे..." ~ ही आहे अर्पणपत्रिका "रमलखुणा" या पुस्तकाची....जी.ए.कुलकर्णी यांची. एक प्रवासी...शरीराने जरी खूप भटकंती केली नसली तरी (बेळगावहून १०० किलोमीटर दूर असलेल्या धारवाडमध्ये येऊन राहिले आणि तिथलेच झाले) मनाने आणि कर्नाटक युनिव्हर्सिटी येथील ग्रंथालयात बसून नॅशनल जिऑग्राफिक मॅगेझिनच्या वाचनाने सार्या जगाची सफर करत असत. त्यांच्यातील प्रवासी प्राचीन काळातील त्या रम्य आणि रोमहर्षक प्रांतांतून भटकण्यास सदैव उत्सुक असे. त्याना ग्रीक, रोमन, आफ्रिकन साम्राज्याच्या घडामोडीविषयी आकर्षण होते.