२३ वर्षांपूर्वी बेंगळूरू मध्ये आल्यावर पहिल्यांदाच अस्सल दक्षिण भारतीय पदार्थांशी सामना झाला. आधी सौदिंडियन म्हणजे दोसा इडली चटणी सांबार एवढंच माहिती होतं. पण साऊथ म्हणजे कर्नाटक, तामिळनाडु, केरळ आणि आंध्र असे चार (तेव्हा चार आता तेलंगणा धरून पाच) निरनिराळी राज्यं आहेत, त्यांच्या निरनिराळ्या संस्कृती, खाद्य संस्कृती आहेत आणि आपण खादाड असल्यानं ते आपल्या पथ्यावरच पडणार आहे हे हळूहळू लक्षात येऊ लागलं. आधीपासून थोडी फसी ईटर असल्यानं सुरुवातीला अवघड वाटलं, पण थोडा आपला दृष्टिकोन बदलल्यावर सर्वच पदार्थ आवडायला लागले.
घोंगुरा म्ह ण जे आपली अंबाडी ही आंध्र मधील अतिशय लाडकी भाजी! ती चटणी लोणचे भाजी भातात मिक्स करून अशा विविध प्रकारे खातात
चटणी साठी साहित्य:
अंबाडी ची जुडी १
हिरव्या मिरच्या ८ ते १०
लसूण पाकळ्या ५ ते ६
कांदा १ बारीक चिरून
जिरं
मेथी दाणे
लाल मिरच्या २
मोहरी
कढ़िपत्ता
कृती:
१. कढईत् थोड्या तेलावर जिरं, मेथी दाणे आणि हिरव्या मिरच्या परतून घ्या
२. वरचे पदार्थ तेलातून बाहेर काढून त्या तेलात स्वच्छ धुतलेली अंबाडी परतून घ्या (अंबाड़ी चिरण्याची गरज नाही)
३. मिक्सर मधे वरचे सगळे परतलेले जिन्नस + मीठ + लसणाच्या पाकळ्या घालून ते मिश्रण 'गुरगुरवा'
साहित्य:
कोवळे दोड़के ४ किंवा ५
हिरव्या मिर्च्या १०
टोमॅटो २ मोठे
चिंच १ लिम्बाएवढी (न भिजवता)
लसणा च्या पाकळ्या ७ ठेचून
कांदा १ बारीक चिरून
कोथिंबीर १/२ जुडी
फोडणी साठी साहित्य:
तेल
लाल मिरच्या २
मेथी दाणे
हिंग
कढीपत्ता
जिरं
कृती:
१. दोड़के धुवून थोडेसे खरवडून घ्या आणि छोटे तुकड़े करा
२. टोमॅटो धुवून तुकडे करा कोथिंबीर धुवून घ्या
३. छोट्या कढ़ाईत दोड़क्याचे तुकडे, हिरव्या मिरच्या, टोमेटो+कोथिंबीर् वेगवेगळे परतून घ्या (कशातही पाणी राहता कामा नये)
४. परतलेला दोड़का, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर मिक्सर मधे वेगवेगळे वाटून घ्या आणि नंतर चिंच घालून एकत्र गुरगुरवा