घोंगुरा म्ह ण जे आपली अंबाडी ही आंध्र मधील अतिशय लाडकी भाजी! ती चटणी लोणचे भाजी भातात मिक्स करून अशा विविध प्रकारे खातात
चटणी साठी साहित्य:
अंबाडी ची जुडी १
हिरव्या मिरच्या ८ ते १०
लसूण पाकळ्या ५ ते ६
कांदा १ बारीक चिरून
जिरं
मेथी दाणे
लाल मिरच्या २
मोहरी
कढ़िपत्ता
कृती:
१. कढईत् थोड्या तेलावर जिरं, मेथी दाणे आणि हिरव्या मिरच्या परतून घ्या
२. वरचे पदार्थ तेलातून बाहेर काढून त्या तेलात स्वच्छ धुतलेली अंबाडी परतून घ्या (अंबाड़ी चिरण्याची गरज नाही)
३. मिक्सर मधे वरचे सगळे परतलेले जिन्नस + मीठ + लसणाच्या पाकळ्या घालून ते मिश्रण 'गुरगुरवा'
४. छोट्या काढल्यात फोडणी करा : तेलात मोहरी + जिरं + हळद + लाल मिरच्या + कढीपत्ता तळून ही चरचरीत फोडणी वरील मिश्रणावर ओता
५. Serve करताना बारीक चिरलेला कांदा घालून दया (हे मात्र नक्की करा)
ही चटणी भाकरी अथवा वरण भाता बरोबर चवदार लागते. नेहमी च्या अंबाडी भाजी चा कंटाळा आला तर चांगला पर्याय आहे.
Photo attached. (Sorry मला plating वगरे करायला जमलं नाही क्षमस्व)
ही करायची कशी? भाजीसारखीच
ही करायची कशी?:अओ: भाजीसारखीच का?
Photo upload failed somehow .
Photo upload failed somehow :(. क्षमस्व