शेरलॉक!
Submitted by तृप्ती आवटी on 8 January, 2014 - 13:54
हल्ली हल्लीच "शेरलॉक होम्स" या पुस्तकाचा (लेखक - Sir Arthur Conan Doyle) पहिला व्हॉल्यूम वाचून संपवला आहे. दुसरा वाचते आहे. आत्ता पर्यंत शेरलॉक होम्स हे पात्र (character या अर्थाने) नुसते ऐकून माहिती होते. मनोगतावर शेरलॉक होम्स च्या अनुवादीत कथा वाचून मूळ कथा वाचायचा मोह झाला. मित्राकडून दोन्ही भाग मिळाल्या मिळाल्या त्यावर तुटून पडले आणि शेरलॉक होम्स ची अशी काही मोहिनी पडली की त्यातून अजून बाहेर पडलेले नाहीये.