आकाशातल्या चांदण्या
Submitted by जो_एस on 14 November, 2014 - 04:07
आज बालदिना निमित्त लहानग्यांना ही भेट
आकाशातल्या चांदण्या (बाल गीत)
आकाशातल्या चांदण्यांची, सुंदर दिसते नदी
लुकलुकत्या या चांदण्यांना, शाळा असते कधी?
आकाशिच्या चांदण्यांना, वाटत नाही भिती
काळ्याकुट्ट अंधारात, खेळती दगड कि माती
आकाशिच्या चांदण्यांना, पाहुन खुलतं कुणी
आमच्या अंगणी, रोज रात्री, फुलते रातराणी
चांदोबा हा लबाड भारी, उगाच करतो खोड्या
कधी होतो बारिकराव, अन् कधी होतो जाड्या
खेळता खेळता एखादी, चांदणी हळूच रुसते
गाल फुगवून आकाशातून, खाली उडी घेते
शब्दखुणा: