गतवर्षी वाचकांना मी लीळा पुस्तकांच्या या अभिनव पुस्तकाचा परिचय करून दिला होता (https://www.maayboli.com/node/77708). वर्षभरात त्या पुस्तकाची मी अनेक पुनर्वाचने केली. त्यातला मला सर्वाधिक आवडलेला भाग म्हणजे त्याची दीर्घ प्रस्तावना. त्यामध्ये लेखकाने अन्य एका पुस्तकाचा उल्लेख केलाय, ते म्हणजे अरुण टिकेकरांचे 'अक्षरनिष्ठांची मांदियाळी'. या पुस्तकाचे नावच इतके भारदस्त वाटले की त्यावरून ते वाचायची तीव्र इच्छा झाली. अक्षरधारा-प्रदर्शनामधून केलेल्या मागच्या पुस्तक खरेदीला आता वर्ष उलटून गेले होते.
देणार्याचे देत जावे, घेणार्याने घेत जावे; घेता घेता घेणार्याने, देणार्याचे हात घ्यावे -- असे तुमचे-आमचे विंदा असे म्हणालेत. जगभराच्या कानाकोपर्यात वसलेल्या मायबोलीकरांनी आपली पुस्तके एकमेकांसोबत वाटून घ्यावीत असे इथे कित्येक वाचकांना वाटत असेल. इथे तुम्ही तुमच्याकडील पुस्तकाची यादी करा. तुम्ही कुठल्या गावात-शहरात-देशात राहतात ते लिहा. पत्ता लिहू नका. फोन न. लिहू नका. फक्त यादी लिहा. म्हणजे पुस्तके देता-घेता येतील आणि त्यातून नवीन मित्रही जमतील. ही कल्पना मीनूने सुचवली आहे. मी फक्त अमलात आणत आहे. हे जर तुम्ही करू शकलात, वेळ असल्यास, तर तेच तुमचे विंदांना मी देणे म्हणेल.