संगमावरी दोन्ही प्रवाह तुंबळ लढणे
Submitted by बेफ़िकीर on 11 November, 2014 - 04:44
गझल - संगमावरी दोन्ही प्रवाह तुंबळ लढणे
संगमावरी दोन्ही प्रवाह तुंबळ लढणे
पुढे लागणे बांधायाला अनेक धरणे
मागे पडलेल्यांनी ज्यास निवडले नेता
त्यास जमेना आता मागे वळून बघणे
आठवणींचा मळ हृदयावर साचत आहे
मेल्याशिवाय शक्यच नाही कुठे मिरवणे
स्वतःतुनी जर वजा न केले कधी स्वतःला
तर मग कुठले जमायला हे शून्य समजणे
नवी पिढी एवढी आंधळी कशी निपजली
अंधांना चष्मे विकणारा डोळस ठरणे
साथ सोडणार्यांना टुकटुक करत म्हणालो
आम्हाला तर अजून जमते वाट पाहणे
म्हणून मागे बघत नसावेत लोक काही
जमत नसावे पुढे जायला पाय उचलणे
अनेक वर्षे झाली आता मे महिन्याला
विषय:
शब्दखुणा: