Submitted by बेफ़िकीर on 11 November, 2014 - 04:44
गझल - संगमावरी दोन्ही प्रवाह तुंबळ लढणे
संगमावरी दोन्ही प्रवाह तुंबळ लढणे
पुढे लागणे बांधायाला अनेक धरणे
मागे पडलेल्यांनी ज्यास निवडले नेता
त्यास जमेना आता मागे वळून बघणे
आठवणींचा मळ हृदयावर साचत आहे
मेल्याशिवाय शक्यच नाही कुठे मिरवणे
स्वतःतुनी जर वजा न केले कधी स्वतःला
तर मग कुठले जमायला हे शून्य समजणे
नवी पिढी एवढी आंधळी कशी निपजली
अंधांना चष्मे विकणारा डोळस ठरणे
साथ सोडणार्यांना टुकटुक करत म्हणालो
आम्हाला तर अजून जमते वाट पाहणे
म्हणून मागे बघत नसावेत लोक काही
जमत नसावे पुढे जायला पाय उचलणे
अनेक वर्षे झाली आता मे महिन्याला
कॅरम, पत्ते, थट्टा, कट्टी, डोळे भरणे
'बेफिकीर' लोकांचा इतका अनुभव आहे
जमतच नाही आता कोणाचे मन जपणे
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वतःतुनी जर वजा न केले कधी
स्वतःतुनी जर वजा न केले कधी स्वतःला
तर मग कुठले जमायला हे शून्य समजणे
म्हणून मागे बघत नसावेत लोक काही
जमत नसावे पुढे जायला पाय उचलणे
चांगल्या द्विपदी
आवडलीच तुमच्या नेहमीच्या
आवडलीच
तुमच्या नेहमीच्या शैलीशी थोडीफार फारकत घेत असलेल्या ओळी असल्याने जरा वेळ लागला इतकेच ! गझल छानच आहे .
धन्स बेफीजी
जबरी....
जबरी....
मतला...वाट
मतला...वाट पहाणे...मिरवणे...मक्ता..... ..वाह...क्या बात है.
साथ सोडणार्यांना टुकटुक करत
साथ सोडणार्यांना टुकटुक करत म्हणालो
आम्हाला तर अजून जमते वाट पाहणे
अनेक वर्षे झाली आता मे महिन्याला
कॅरम, पत्ते, थट्टा, कट्टी, डोळे भरणे
'बेफिकीर' लोकांचा इतका अनुभव आहे
जमतच नाही आता कोणाचे मन जपणे >>>> या द्विपदी जास्त आवडल्या.
मलाही तुमच्या नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळी वाटली, पण आवडली
स्वतःतुनी जर वजा न केले कधी
स्वतःतुनी जर वजा न केले कधी स्वतःला
तर मग कुठले जमायला हे शून्य समजणे
उत्तम!
संगमावरी दोन्ही प्रवाह तुंबळ
संगमावरी दोन्ही प्रवाह तुंबळ लढणे
पुढे लागणे बांधायाला अनेक धरणे
स्वतःतुनी जर वजा न केले कधी स्वतःला
तर मग कुठले जमायला हे शून्य समजणे
म्हणून मागे बघत नसावेत लोक काही
जमत नसावे पुढे जायला पाय उचलणे
वा व्वा !
म्हणून मागे बघत नसावेत लोक
म्हणून मागे बघत नसावेत लोक काही
जमत नसावे पुढे जायला पाय उचलणे
वा.
नवी पिढी एवढी आंधळी कशी
नवी पिढी एवढी आंधळी कशी निपजली
अंधांना चष्मे विकणारा डोळस ठरणे
मार्मिक ! तुमच्या गझलांबद्दल मी काय बोलणार भुषणजी. आवडलीच हे सांगणे नलगे _/\_
मस्त बेफीजी..
मस्त बेफीजी..
>> मागे पडलेल्यांनी ज्यास
>> मागे पडलेल्यांनी ज्यास निवडले नेता
त्यास जमेना आता मागे वळून बघणे
आठवणींचा मळ हृदयावर साचत आहे
मेल्याशिवाय शक्यच नाही कुठे मिरवणे
अनेक वर्षे झाली आता मे महिन्याला
कॅरम, पत्ते, थट्टा, कट्टी, डोळे भरणे
खूप मस्त..
मस्त गझल. आवडली.
मस्त गझल. आवडली.