जल्लोष

धुनी आठवांची

Submitted by संतोष वाटपाडे on 11 November, 2014 - 01:58

तुझ्या आठ्वांची धुनी भस्म झाली प्रिये धूर येतो तरी यातनांचा
नको आसवे बेगडी आज वाहू इथे यज्ञ झाला खुळ्या भावनांचा...

अरे वाजवा यंत्रवाद्ये जराशी हवा तेवढा आज जल्लोष व्हावा
तिला बोलवा एकदा नाचण्याला बघू वेग आता तिच्या पावलांचा...

रिते जाम केले जरी मी कितीही नशा यायची ना मला कोणतीही
कधी वाटले फ़ार बेभान व्हावे पुन्हा वास घेतो जुन्या वेदनांचा...

तमाहीन होती तमाहीन आहे तिची खोड जाणार नाही कधीही
झरे अंतरी वाहती ज्यात नाही कधी नेम नाही अशा कातळांचा ...

जशी काळजी घ्यायचो नेहमी मी स्वतःहून नात्यास सांभाळण्याला
तसे यत्न केले तिने मात्र नाही दिला नेमका आसरा वादळांचा...

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - जल्लोष