Submitted by संतोष वाटपाडे on 11 November, 2014 - 01:58
तुझ्या आठ्वांची धुनी भस्म झाली प्रिये धूर येतो तरी यातनांचा
नको आसवे बेगडी आज वाहू इथे यज्ञ झाला खुळ्या भावनांचा...
अरे वाजवा यंत्रवाद्ये जराशी हवा तेवढा आज जल्लोष व्हावा
तिला बोलवा एकदा नाचण्याला बघू वेग आता तिच्या पावलांचा...
रिते जाम केले जरी मी कितीही नशा यायची ना मला कोणतीही
कधी वाटले फ़ार बेभान व्हावे पुन्हा वास घेतो जुन्या वेदनांचा...
तमाहीन होती तमाहीन आहे तिची खोड जाणार नाही कधीही
झरे अंतरी वाहती ज्यात नाही कधी नेम नाही अशा कातळांचा ...
जशी काळजी घ्यायचो नेहमी मी स्वतःहून नात्यास सांभाळण्याला
तसे यत्न केले तिने मात्र नाही दिला नेमका आसरा वादळांचा...
-- संतोष वाटपाडे (नाशिक)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मीटरच्या प्रेमात पडून केलेली
मीटरच्या प्रेमात पडून केलेली रचना वाटली. काय म्हणावयाचे आहे हे स्वच्छ आणि स्पष्ट आले असते तर मीटरचीही मजा घेता आली असती. असो,
शुभेच्छा!
केल्याने होत आहे रे.....आधी
केल्याने होत आहे रे.....आधी केलेची पाहिजे......धन्यवाद !!!
आत्ममग्नजींच्या मताशी मीही
आत्ममग्नजींच्या मताशी मीही थोडाफार सहमतच
तुझ्या आठ्वांची धुनी भस्म
तुझ्या आठ्वांची धुनी भस्म झाली प्रिये धूर येतो तरी यातनांचा
नको आसवे बेगडी आज वाहू इथे यज्ञ झाला खुळ्या भावनांचा..
खुपच आवडला हा शेर!
बाकी व्याकरण आपण ज्ञात्यांकडून शिकालच.
ह.बा. यांच्याशी सहमत
ह.बा. यांच्याशी सहमत
हे यांच्याशी सहमत......ते
हे यांच्याशी सहमत......ते त्यांच्याशी सहमत आणि मी सर्वांशी सहमत.....धन्यवाद !!!!!
<<<मी सर्वांशी सहमत....>>> ये
<<<मी सर्वांशी सहमत....>>>
ये हुई ना बात संतोष जी !
ह्या वृत्तातील शेवटचा एक गा
ह्या वृत्तातील शेवटचा एक गा कमी केला की जे वृत्त तयार होते (नेहमीप्रमाणे नाव माहीत नाही मला ) ते अधिक प्रभावी प्रवाही बांधीव वाटते वाटपाडे साहेब . मोस्टली तेच वापरले जाते त्यामुळे हे जरा कमी इंप्रेसिव्ह वाटत असणेही शक्य आहे असे एक निरीक्षण !!
धन्यवाद
आवडली...
आवडली...
वैभवजी ते सुमंदारमाला वृत्त
वैभवजी ते सुमंदारमाला वृत्त होईल..... लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा