नाती-गोती
लग्न / नाती याकडे स्त्री जास्त गांभिर्याने पाहते की पुरूष ?
(माबो गणेशोत्सव चालू असताना या प्रश्नाची वेळ चुकलेली आहे याची कल्पना आहे. पण नंतर लक्षात राहणार नाही आणि लिखाणाचा उत्साह बारगळण्याची शक्यता म्हणून विचारून टाकतो).
प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २
आणि दुसऱ्याच दिवशीपासून मला ह्या वेबसाईटचा मला मुलगी शोधून देण्याचा प्रयत्न लक्षात आला. मला मुलगी कोणत्या वयोगटातील अपेक्षित आहे ह्याची माहिती मी त्यांना आधीच दिली होती. त्याप्रमाणे रोज दोन इ-मेल मला येऊ लागले. एका इ-मेल मध्ये मला आठ ते नऊ मुली दिसायच्या. ह्या मुली त्यांच्यामते मला अनुरूप ( match) होत्या. अहो, एक ठीक पण नऊ मुली मला एकाच दिवशी अनुरूप कशा असतील? पण आपण आता choose from the display ह्या इंटरनेटच्या विश्वात आलो आहोत ह्याचा मला साक्षात्कार झाला. आणि असे असून सुद्धा मी त्या नऊ च्या नऊ मुली उत्सुकतेने न्याहाळू लागलो. मुलीचे फोटो इंटरनेट वर पहायची अधिकृत संधी फुकट कोण घालवेल?