विधानसभा-२०१४
Submitted by हतोडावाला on 25 September, 2014 - 04:57
पितृपक्ष संपले व अर्ज दाखल व्हायला लागेल तरी सुद्धा अजून सेना-भाजप आणि काँग्रेस-रा. काँग्रेस जागा वाटपा वरुन रस्सीखेच करताना दिसत आहेत. आघाडी सोडून बाकी सर्वाना आपल्या अगाध शक्तीचा साक्षात्कार झाला असून मुख्यमंत्र्याची स्वप्ने पडू लागली आहेत. उधोजीराजे तर चक्क राज्यभिषेकाची तयारी करुनच बसलेत असा एकूण थाट दिसतो. भाजपनी पहिल्यांदाच सर्व शक्ती पणाला लावली असून लहान्भाऊ- मोठाभाऊ वाला प्रश्न एकदाचा निकाली काढायचे ठरवले दिसते. जानकरानी तर काल चक्क मीच महायूतीचा मालक असून सेना किंवा भाजपनी ठरवावे की त्याना आमच्या सोबत यायचे की स्वतंत्र लढायचे अशी दचकविणारी प्रतिक्रिया हाणली.
विषय:
शब्दखुणा: